Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 21, 2026
in सोलापूर
0
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शस्त्रक्रियेसाठी लाच मागणारे डॉक्टर आणि ‘आरोग्य मित्र’ एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील डॉक्टर व आरोग्य  मित्राविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २९४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (वय ४५, खाजगी डॉक्टर) व सोमनाथ इंगळे (वय ३८, आरोग्य मित्र) यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची विनंती केली. मात्र, संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी १६,००० रुपयांची मागणी केली. त्यापैकी ६,००० रुपये सुरुवातीला स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित १०,००० रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर २४ मार्च २०२६ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी कारवाई केली. या कारवाईत आरोपींनी १०,००० रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ५,००० रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यावरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत.
शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मंद्रूपमध्ये अवकाळी पावसाचे जोरदार बॅटींग

Next Post

जुळे सोलापूरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘कर्तृत्ववान महिलां’चा सन्मान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जुळे सोलापूरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘कर्तृत्ववान महिलां’चा सन्मान

जुळे सोलापूरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त 'कर्तृत्ववान महिलां'चा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक