Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

जावीद आवटे यांचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 13, 2026
in सोलापूर
0
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रामपंचायत प्रशासना विरोधात मंद्रूपच्या नागरिकांमध्ये असंतोष

नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मंद्रूप… वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही मंद्रूपच्या नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये भरच पडत असल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हद्दवाढ भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सरपंच अनिता कोरे व उपसरपंच भगवान व्हनमाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीकडून चार दिवसात मंद्रूपच्या समस्या सोडवण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले . मात्र चार दिवसात समस्या न सुटल्यास मंद्रूपच्या ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे यांनी दिला आहे .
मंद्रूप मध्ये एक महिन्यापासून बंद पाणीपुरवठा, पावसाळ्यातील चिखलमय रस्ते, गावातीव अस्वच्छता, आठवडा बाजारातील गैरसोय, विविध वित्त आयोगातील निधी खर्च व कर वसूली चौकशी , बंद दिवाबत्ती यासह विविध समस्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले . अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेऊन सरपंच अनिता कोरे व उपसरपंच भगवान व्हनमाने यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना लेखी पत्र देऊन चार दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी तालुका सचिव भीमाशंकर झळके, सिकंदर मकानदार , मल्लिकार्जून कांबळे, हारून मकानदार, यासीन मकानदार, पैगंबर नदाफ, मळसिध्द जाधव, राजकुमार कुमठेकर, फारूक शिकलगार, सद्दाम मकानदार, इक्बाल आवटे, मुजम्मिल शेख, श्रीशैल मुंजे व षडाक्षरी स्वामी आदी उपस्थित होते.
…
चौकट
…,
अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकणार
…
मंद्रूप मधील विविध समस्यांबाबत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले . ग्रामपंचायत कार्यालया समोर आंदोलन करताना सरपंच व उपसरपंच यांनी चार दिवसात समस्या सोडवण्याचे लेखी पत्र दिला आहे. त्यामुळे चार दिवसात समस्या न सुटल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे.

जावेद आवटे, तालुकाध्यक्ष , अखिल भारतीय किसान सभा ,
दक्षिण सोलापूर

____________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

Next Post

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135102

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697