Friday, September 11, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

वनमंत्र्यांशी मुंबईत माजी आमदार शिवशरण पाटील व डाॅ. बसवराज बगले यांची चर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 9, 2026
in सोलापूर
0
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक
0
SHARES
216
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लिंगायत समाजाच्या दफनभूमीची समस्या सुटणार !

सोलापूर – राज्यातील लिंगायत धर्म संस्कृती इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या दफन भूमिसाठी मागणी आल्यास त्वरीत वन विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात येईल,अशी हमी देऊन त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. माजी आमदार व लिंगायत समाजाचे नेते शिवशरण अण्णा पाटील आणि लिंगायत चळवळीचे समाजसेवक डाॅ. बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री नाईक यांची भेट घेतली.राज्यातील प्रत्येक गावात लिंगायत समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची जागा देण्याची मागणी केली. त्यानुसार मंत्री नाईक यांनी संबधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
ज्या गावात स्मशान भूमीसाठी जागा अपुरी असेल, गायरान आणि गावठाणाची जागा शिल्लक नसेल,अशा ठिकाणी जवळपास राखीव वन विभागाची जमीन असेल आणि तशी मागणी आली तर त्वरीत स्मशान भूमीची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .लिंगायत धर्मात अंतिम संस्काराची वेगळी पद्धत आहे,अनेक ठिकाणी त्यांची स्वतंत्र दफनभूमी नाही,तशी मागणी आल्यावर त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यास वन विभाग कटिबद्ध आहे.अशी हमी या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
जुळे सोलापूरच्या कंबर तलावाजवळील 22 गृहनिर्माण संस्थांच्या नागरिकांना वन विभागाची जागा त्वरीत हस्तांतरीत करून त्यांना मालकी हक्क मिळावेत, काशी विश्वनाथ मंदिराच्या लिंगपुजेसाठी भाविकांना स्वतंत्र रहदारी द्यावी आणि गुरूदेव समाजसेवा मंडळाच्या जागेत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी स्वतंत्र जागेचा ताबा द्यावा आदि मागण्यांचे निवेदन देऊन माजी आ. पाटील आणि डाॅ. बगले यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.या सर्व विषयात तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी सोलापूरचे उपवन संरक्षक कुलराजसिंह,कोल्हापूरचे लिंगायत नेते धनंजय महाजन, मदन पोलके, गंगाधर स्वामी आदि उपस्थित होते.


नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

Next Post

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी 'सामोपचारा'ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

132714

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697