Friday, September 11, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

महावितरणने पूर्वसूचना देऊन भारनियमन करावे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 5, 2026
in सोलापूर
0
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश 

सोलापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या आपत्कालीन विद्युत भारनियमनामुळे नागरिक तसेच कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारनियमनाबाबत योग्य नियोजन करावे. भारनियमनाची आवश्यकता असल्यास नागरिकांना पूर्वसूचना द्यावी, तसेच आपत्कालीन भारनियमन टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील विद्युत भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भारनियमनाची माहिती दिली. मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली.
भारनियमन करणे अपरिहार्य असल्यास त्याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना देण्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. भारनियमनाचा कालावधी आणि त्यामागील कारणांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळेल, याची दक्षता घ्यावी, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत ग्राहकांनी दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्ष कार्यालयात विचारणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सौहार्दपूर्ण आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत. नागरिकांशी उद्धटपणे अथवा चुकीच्या पद्धतीने संवाद साधू नये. ग्राहकांना भारनियमनाचा कालावधी, कारणे आणि वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबतची उपलब्ध माहिती स्पष्टपणे द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत पालकमंत्री गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

—————————————————————
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव..

* नवप्रभात न्यूज पोर्टल *

*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

Next Post

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

132714

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697