एम. के. फाउंडेशनने घडविला ज्योतीर्लिंगचे दर्शन
सोलापूर : श्रावण मासाचे औचित्य साधून एम. के. फाउंडेशन तसेच महादेव कोगनुरे मित्र परिवाराने श्री क्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग व नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन दर्शन घडविले . श्रावण महिन्यात महादेवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. परिवारातील सदस्यांना एकत्रितपणे धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे, भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेता यावा आणि आपापसातील स्नेह व बंधुभाव अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने महादेव कोगनूरे यांच्याकडून विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .
एम. के. फाउंडेशन आणि महादेव कोगनुरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जात असून, त्याच भावनेतून या वर्षी श्रावण मासनिमित्त भक्तिमय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, सामाजिक बांधिलकी आणि आपलेपणाची भावना जपत परिवारातील सदस्यांनी एकत्रितपणे हा आध्यात्मिक प्रवास केला. 
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.













