प्रशांत अरबाळे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाची टाळाटाळ
सोलापूर..
अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक शिक्षकांनी तक्रार केली आहे. चुकीच्या कामकाजामुळे शैक्षणिक वातावरण ढासळली आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रशासना व गटशिक्षण अधिकारी अरबाळे यांच्या विरोधात आत्मदहन करणार असल्याचे अक्कलकोट तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटना अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी सांगितले. यासंदर्भात कट्टीमनी यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ व शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक वेळा पुणे विभागीय आयुक्त यांचे अधिकार वापरून व मनमानी कारभार करून शिक्षकांचे अनेक प्रतिनियुक्ती केले आहे. त्या प्रतीनियुक्त विरोधात सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल देण्यात आली आहे. त्या तक्रारीस अनुसरून चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आले. चौकशीचे अहवाल 16 जानेवारी 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठवलेले फाईल शिक्षण विभागाकडे आले नाही. एक वर्ष झाले तरी फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून हलवण्यास तयार नाही. अद्यापी कारवाई करून शिक्षण विभागकडे फाईल पाठवले नाही.त्या विरोधात वारंवार उपोषण केले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. तरी प्रशासन प्रभारी गट शिक्षणाधिकारी अरबाळे यांचे बाजूने राहिले . कारवाई केलेले फाईल अद्यापी बाहेर आले नाही. उपोषण करताना शिक्षणाधिकारी यांनी वारंवार पत्र देऊन प्रशासनास वेठीस धरू नका असे पत्र दिले आहे.
अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात अनेक महिला शिक्षक यांचे तक्रारी आहेत. त्या तक्रारीबद्दल अद्यापही निर्णय झाले नाही. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत आर्थिक वसुली सुरू असल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि तत्कालीन शिक्षण अधिकारी कादर शेख यांना देण्यात आले आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? गट शिक्षण अधिकाऱ्यांचे विरोधात ४० दिवस उपोषण बसल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झाले नाही. अधिकाऱ्यांचे विरोधात पुरावा देऊन सुद्धा कारवाई का होत नाही ? त्यांचे मागे कुठले अदृष्य शक्ती आहे. याबद्दल चर्चा सुरु आहे. म्हणून 2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत निर्णय नाही झाल्यास जिल्हा परिषद समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कट्टीमनी यांनी दिला आहे.
————————————————————
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.












