Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 15, 2026
in सोलापूर
0
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मसाप दक्षिण शाखेच्या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद

सोलापूर ः- ब्रिटीशांच्या विरूध्द झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक आहे, असे प्रतिपादन दैनिक सकाळचे संपादक तथा युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील यांनी केले. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्त ‘वंदे मातरम गीताचा लपलेला इतिहास’ या विषयावर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अ‍ॅम्फी थिएटर मध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


भारतीय स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये झालेले बंड त्यापेक्षाही आधी 37 वर्षापुर्वी जवळपास 20 लाख भारतीयांनी सहभाग घेवून ब्रिटीशांविरूध्द  स्वातंत्र्याचा लढा उभा केला होता त्या लढ्याचे घोषवाक्य होते ओम वंदे मातरम. स्वातंत्र्यासाठी उभा राहिलेल्या लढ्यात प्रेरणा देणारे वंदे मातरम किती शक्तीशाली होते याची प्रचिती आल्यानेच ब्रिटीश राजवटीतील भारतीय अधिकारी डेप्युटी मॅजिस्टे्रट बंगाली कवी बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी 1870 मध्ये बंगाली भाषेत वंदे मातरम कविता लिहली. त्यानंतर आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. थोर स्वातंत्र्य सेनानी कवी रविंद्रनाथ टागोर यांनी 1896 रोजी झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम ही वंदेमातरम कविता सादर केली तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरलेल्या वंदेमातरमने देशात क्रांती केली आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी वंदे मातरम या गीताची प्रेरणा ठरली. नुकतेच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्या नंतर भारताचे राष्ट्रीय गीत ठरलेल्या या वंदे मातरमचा लपलेला इतिहास काय आहे. याबाबत दैनिक सकाळचे संपादक  आणि युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील आपल्या व्याख्यानातून सांगितले. आपल्या देशाचा वरवरचा आणि तात्पुरता इतिहासच आजच्या तरूणांना माहित आहे. असे न होता तरूणांनी आपल्या देशाच्या महान इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आनंदमठ कादंबरीचे वाचन केले पाहिजे असेही सिध्दाराम पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. मसाप दक्षिण सोलापूर शाखेला नुकताच वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. विविध आणि वैशिष्ट्यूपर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा दक्षिण शाखेने सुरू ठेवून आजचा वंदे मातरमचा लपलेला इतिहास यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार दक्षिण सोलापूर शाखेचे प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक सात्विक बडवे यांच्यासह सिध्देश्‍वर बॅकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, शिवसेनेचे महेश धाराशिवकर, जनता बँकेचे पुरूषोत्तम उडता, सिध्देश्‍वर किणगी, विशाल शिंदे, ज्ञानेश्‍वर मॅकल, गायक दिपक कळढोणे, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, डॉ. व्यंकटेश मेतन, अ‍ॅड मंकणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक श्रोते तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी विद्याथींनीची मोठी गर्दी होती. शेवटी शिल्पा जिरांकलगी यांनी वंदे मातरम हे गीत गायन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

Next Post

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135096

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697