Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 13, 2026
in सोलापूर
0
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन 

ऑनलाइन दंड भरण्याच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका

सोलापूर :- लोकअदालतीच्या नावाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकअदालतीमध्ये दंड भरण्यासाठी किंवा प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश अथवा ऑनलाइन पेमेंट लिंक पाठविली जात नसल्याचे विधी सेवा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

लोकअदालती ही परस्पर सामंजस्य, संवाद आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे वाद मिटविण्याची व्यवस्था आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून मोबाईलवरून पैसे जमा करण्याची मागणी केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सुनील शिंदे यांनी केले आहे.

विशेषतः बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड तपशील, क्रेडिट कार्ड माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये. अशा माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करु शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकअदालतीच्या नावाने पैसे भरण्याची मागणी करणारा संदेश, फोन कॉल किंवा लिंक प्राप्त झाल्यास संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून खातरजमा करावी. पडताळणी न करता कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असेही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी जागरूक राहून अशा फसव्या संदेशाबाबत संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांची सतर्कता हेच सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर सचिव सुनील शिंदे यांनी नमूद केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

Next Post

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

"इन कॅमेरा" समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135160

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697