Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 12, 2026
in सोलापूर
0
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी करा- यशदा चे उप महासंचालक डाॅ. कलशेट्टी

सोलापूर – शाश्वत विकास ध्येय साध्य करणे साठी नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गाव स्वच्छ व समृध्द होईल. असे प्रतिपादन यशदा चे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे हस्ते करणेत आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, यशदा चे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश कोपुरवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.


१६ वा वित्त आयोग मधून ८० टक्के बेसिक ग्रॅन्ट मध्ये ५० टक्के स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पाण्याचे व्यवस्थापन बंधित निधी साठी खर्च करावा लागणार आहे. अबंधित निधीतून ५० टक्के खर्च करताना पंचायत विकास निर्देशांक नुसार १ किंवा २ थीम संकल्प म्हणून केलेले थीम वर २५ टक्के निधी किमान खर्च केला पाहिजे. रस्ते कामांना २५ टक्के पेक्षा जास्त निधी खर्च करता येणार नाही असेही डाॅ. कलशेट्टी या्ंनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन ला लक्ष द्या. सॅनिटरी नॅपकिन व डायपर यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात चार डस्टबीन मध्ये कचरा चे विलगीकरण करणे होणे अपेक्षित आहे. हे काम ग्रामपंचायतीने देखील करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाचे योजना ग्रामपंचायतीचे स्वतः चे उत्पन्न व वित्त आयोग असे अभिसरनाद्वारे कामे हाती घेता येईल असे उपसंचालक कलशेट्टी यांनी सांगितले.

गावपातळीवर कचरा वर्गीकरण आवश्यक – सिईओ कुशल जैन

सिईओ कुशल जैन यांनी जिल्हा व तालुका व गाव स्तरावर आराखडे तयार करून भरताना काळजी घ्यावे. जेणेकरून पुन्हा बदलाची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचने नुसार ओला व सुका कचरा व घातक कचरा साठी डस्टबीन व कचरा चे विलगीकरण करणे आवश्यक असल्याचे सिईंओ कुशल जैन यांनी सांगितले.
या कार्यशाळेस यशदाचे प्रविण प्रशिक्षक शांतकुमार स्वामी , राजेंद्र वारगड, हनुमंत कांदे, भिमराव तुळजापूरे यांनी मार्गदर्शन केले.

_______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

Next Post

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135102

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697