Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांची दररोज बायोमॅट्रीक बंधनकारक !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 13, 2026
in सोलापूर
0
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 विद्यापीठाकडून प्राचार्यांना निर्देश 

सोलापूरः  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी शासन निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याच्या सूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या प्रवेश समितीची बैठक कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.


विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदविण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तातडीने बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्याचा नियमित वापर सुरू करावा, असे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संपूर्ण नोंद व रेकॉर्ड महाविद्यालयांनी जतन करून ठेवावी. बायोमेट्रिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचूक माहिती उपलब्ध होणार असून शैक्षणिक प्रक्रियेत अधिक शिस्त निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार सर्व वर्गखोल्या तसेच प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शैक्षणिक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी एईडीपी (Apprenticeship Embedded Degree Programme) अंतर्गत महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन योग्य विषयांची निवड करावी तसेच त्यासंदर्भातील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत, असेही निर्देश देण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून ते अधिक कौशल्यसंपन्न व रोजगारक्षम बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सीसीटीव्हीमुळे कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गुणवत्तावृद्धीस मदत होईल, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.

______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

Next Post

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135102

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697