Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 11, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लमाण हाऊसिंग सोसायटी प्रकरणावर २० जूनपर्यंत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

मंद्रूप  :
मंद्रूप येथील सेवालाल लमाण हाऊसिंग सोसायटी रद्द झाल्यानंतर भोगवटदारांच्या नावांची मालक सदरी नोंद करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप कार्यवाही न केल्याने संबंधित सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असतानाही मंद्रूप ग्रामपंचायतीकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आरके फाउंडेशनचे उपाध्यक्ष सावन चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात सावन चव्हाण यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिला आहे.

मंद्रूप येथील सेवालाल लमाण हाऊसिंग सोसायटी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २१(अ) अंतर्गत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर यांच्या ३० मार्च २००७ रोजीच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित जागांवरील भोगवटदार सदस्यांची नावे मालक सदरी नोंदविण्यासाठी सदस्यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत लेखी साद केला होता.  तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या अर्जाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत मंद्रूप यांना संबंधित प्रकरणात त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून प्रकरण जाणूनबुजून रखडविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून संबंधित जागांचा भोगवटा असलेल्या सदस्यांना मालकी हक्काच्या नोंदीअभावी विविध शासकीय व आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मंद्रूप ग्रामपंचायतीने या प्रकरणाचे २० जून २०२६ पर्यंत निराकरण न केल्यास सर्व संबंधित सदस्यांना सोबत घेऊन पंचायत समिती, दक्षिण सोलापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे संबंधित सदस्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

 

Previous Post

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

Next Post

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135102

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697