Monday, June 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 14, 2026
in सोलापूर
0
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 आश्रमशाळांमधील शिक्षकांचे समायोजन पारदर्शक … इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहसंचालक गणेश सोनटक्के यांची माहीती

सोलापूर..शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ नुसार  २० ऑक्टोंबर २०२५ ची सरल प्रणालीवरील/युडायस प्लसवरील (व्हॅलिड) वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन नियमानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व ९७ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांची संच मान्यता  जिल्हा कार्यालयाकडून तालुकानिहाय आश्रमशाळांचे  शिबीर आयोजित करुन व मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन त्यांच्या समक्ष पारदर्शक पध्दतीने निर्गमित करण्यात आले . सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच समायोजनाची प्रक्रिया इन कॅमेरा अत्यंत पारदर्शक पद्धतीने अतिरिक्त शिक्षकाना विश्वासात घेवून नियमानुसार पार पाडली गेली असल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  सर्व आश्रमशाळांना वितरीत करण्यात आले असल्याची माहिती  इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक गणेश सौनटक्के यांनी दिली .

संच मान्यतेनुसार ज्या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरले आहेत. अशा आश्रमशाळांना शाळा/संस्था स्तरावरुन सर्व कर्मचाऱ्यांचे लेखी म्हणणे आक्षेप विचारात घेऊन बिंदु नामावली पडताळणी नोंदवही नुसार, सेवाजेष्ठतेनुसार, माध्यमिक विभागामधील विषय शिक्षक उपलब्धता विचारात घेऊन अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बिंदु नामावली, सेवाजेष्ठता इत्यादी सर्व तपासून नियमानुसार अतिरिक्त ठरविण्याची कार्यवाही करुन त्याबाबत संस्था, शाळा स्तरावरुन अतिरिक्त घोषित केलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची नावे जिल्हा कार्यालयास सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
जिल्हास्तरावर शाळा/संस्था स्तरावरुन प्राप्त माहितीचे संकलन करुन अतिरिक्त होणाऱ्या सुमारे २०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्राथमिक स्वरुपातील यादी प्रकाशित करुन अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर यादीच्या अनुषंगाने त्यांचे आक्षेप नोंदविण्याबाबत लेखी कळविण्याबाबत जिल्हा कार्यालयाने सर्व मुख्याध्यापकांना निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.


जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेल्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या प्राप्त लेखी आक्षेपांवर दि. ०१ जुन  रोजी एकत्रित सुनावणी सर्वांसमक्ष आयोजित करुन पारदर्शक पध्दतीने सुनावणीच्या अनुषंगाने नियमानुसार सर्व निर्णय देण्यात आले व त्यानुसार जिल्हास्तरीय अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पद निहाय, प्राथमिक, माध्यमिक, अल्पसंख्याक, मान्यता रद्द आश्रमशाळा येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची जेष्ठता यादी जिल्हा कार्यालयाकडून दि. ०८ जून रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार १० रोजी सर्व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे जिल्हास्तरीय समायोजन समुपदेशनाने जिल्ह्यातील उपलब्ध रिक्त जागेंच्या प्रमाणात जेष्ठतेनुसार तसेच माध्यमिक विभागातील विषय शिक्षकांच्या प्राप्त झालेल्या संबंधित आश्रमशाळांकडील मागणीनुसार समायोजनाची प्रक्रीया पारदर्शक पध्दतीने समुपदेशनाने सर्वांसमक्ष पार पाडण्यात आली. शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उपलब्ध होणाऱ्या समकक्ष पदांवर शासन परिपत्रक दि. १२ जुलै २०१९ नुसार समायोजन करण्यात आल्याची माहिती या दरम्यान प्राप्त झाली . याबाबत स्वराज्य शिक्षक संघटना व शिक्षक भारती संघटना, संस्थापक यांनी सहायक संचालक  गणेश सोनटक्के यांचे विशेष आभार मानले असल्याची माहिती समोर येत आहे.

_________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

Next Post

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे 'या' शाळेकडे मुलांचे अकर्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

June 14, 2026
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक