Wednesday, July 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पालखी मार्गावरील विविध सुविधांवर “वारकरी खुश”..!

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 19, 2026
in सोलापूर
0
पालखी मार्गावरील विविध सुविधांवर “वारकरी खुश”..!
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाउसफुल्ल

सोलापूर – ग्रामविकास व पंचायराज विभागाकडून पालखी मार्गांवर शौचालय सुविधा, स्नानगृह, मसाज सुविधा , हिरकणी कक्ष , पिण्याचे पाणी, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हॅंगर) मुख्यमंत्री आरोग्य रथ , मोबाईल चार्जिंग सुविधा, या बरोबर या सुविधा पुरविताना सहाय्यक म्हणून वारी दूत तैनात करणेत आले आहेत. या सुविधांवर वारकर्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर संस्थानचे विश्वस्त यांचे समवेत सुविधा व येणारे अडचणी बाबत चर्चा केली.
पालकमंत्र्यांनी सोहळा प्रमुखां समवेत जमिनीवर मांडी घालून वारकरी यांचे समवेत प्रसाद घेतला. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे संस्थानच्या वतीने महावस्त्र व प्रसाद देऊन स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार , महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अॅड. अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मराठी चित्रपट अभिनेता भाऊ कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांचा सोहळा प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले. . या वेळी गटविकास अधिकारी पांढरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.
ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले. ग्रामविकास व पंचायराज विभागाकडून पुरविण्यात येणार्‍या विविध सुविधांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पालखी सोहळा प्रमुखांना दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे दोन आरोग्यदूत मोटारसायकल वर बसून वैद्यकीय किटसह वारकरी यांना जागेवर फिरून सुविधा देत आहेत. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी या सेवेची पाहणी केली.
पालखी मार्गावर चालून थकलेले भाविकांना विसावा मिळणे साठी ग्रामविकास व पंचायराज विंभागाने मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राची सोय केली आहे. या सुविधांवर वारकरी खुश आहेत. यात हिरकणी कक्ष व मसाज सुविधा देण्यात आलेली आहे. शौचालय व सोहळा पुढे गेल्या नंतर मार्गातील साफसफाई करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव नियंत्रण करीत आहेत.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही

Next Post

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री यांच्याकडून स्वागत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री यांच्याकडून स्वागत

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री यांच्याकडून स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

July 21, 2026
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक