फाटणार नाही, भिजणार नाही!
सोलापूर..
देशातील चलन व्यवस्थेत व दैनंदिन व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १० रुपये आणि २० रुपयांच्या नोटा आता नव्या प्लास्टिक (पॉलिमर) रूपात बाजारात येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी १०० कोटी प्लास्टिक नोटा चलनात आणल्या जातील. या नोटा भारतातील विविध हवामान आणि परिस्थितीमध्ये किती टिकतात, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. नव्या प्लास्टिक नोटा येणार असल्या तरी सध्याच्या कागदी नोटा पूर्णपणे वैध राहतील. सरकारने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

जगातील ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम (UK) आणि न्यूझीलंड यांसारख्या ६० हून अधिक देशांमध्ये आधी पासूनच पॉलिमर (प्लास्टिक) नोटांचा यशस्वी वापर केला जात आहे. भारतात आरबीआयच्या नोट-मुद्रण युनिटने यासाठी जागतिक निविदा काढली असून, लवकरच या नोटांची छपाई करून त्या टप्प्याटप्प्याने बाजारात आणल्या जाणार आहेत.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













