Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आकांक्षित तालुका कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 6, 2026
in सोलापूर
0
आकांक्षित तालुका कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निती आयोगाची जिल्हा स्तरीय आढावा बैठक संपन्न

सोलापूर-
जिल्हा परिषद अंतर्गत निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावरील समन्वय व आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील अक्कलकोट, सांगोला व करमाळा या तालुक्यांचा समावेश केल्याची माहीती सिईओ कुशल जैन यांनी दिली.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सुर्यकांत भुजबळ गटविकास अधिकारी शंकर कवितके अक्कलकोट, गटविकास अधिकारी अमित कदम करमाळा , सहगट विकास अधिकारी वसंत फुले, सांगोला तसेच जिल्हा स्तरीय संबधित विषयांचे खाते प्रमुख आणि तालुका स्तरावरील सर्व विभागप्रमुख आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत सिईओ कुश जैन यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकास या क्षेत्रांतील कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
देशातील सर्वाधिक मागासलेल्या 513 व महाराष्ट्रातील 27 तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला असून, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा व सांगोला 03 तालुक्याचा समावेश आहे.
निती आयोगाच्या Ranking मध्ये अक्कलकोट राज्यामध्ये (03) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सांगोला प्रगतीपथावर आहे. सदर कार्यक्रमामध्ये आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित निर्देशांकांवर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी 38 निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात असून, या बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निर्धारित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शासकीय वसतीगृहात प्रवेश घ्यायचा आहे, तर पहा वेळापत्रक

Next Post

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्यास विरोध

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्यास विरोध

'शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलण्यास विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133869

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697