Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्यास विरोध

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 6, 2026
in सोलापूर
0
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्यास विरोध
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : 
सोलापूर जिल्हा परिषदेतील ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बदलण्याचा करण्यात आलेला ठराव रद्द करून गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेले ‘शिवरत्न’ हेच नाव कायम ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. दुसरीकडे संभाजी आरमारनेही ‘शिवरत्न’ नाव बलण्यास विरोध केला आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाला सुमारे ४० वर्षांपूर्वी ‘शिवरत्न’ हे नाव देण्यात आले होते. हे नाव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले असून त्यास ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्याच्या जनभावनांचा अनादर करणारा असून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
‘शिवरत्न’ हे नाव बदलून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाला कोणताही विरोध नसून, त्यांच्या नावाने नवीन वास्तू अथवा सभागृह उभारून त्यास नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड (दक्षिण सोलापूर), जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष प्रवीण इरत शेट्टी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष पद्मसिंह शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजित पात्रे आदी उपस्थित होते.
       जिल्हा परिषदेतील ‘शिवरत्न सभागृह’चे नाव बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा. अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, शहर सचिव विश्वजीत गंभीरे, शहर उपाध्यक्ष सनी , जिल्हा सचिव गुंडपा जाधव आदी उपस्थित होते.
__________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आकांक्षित तालुका कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश

Next Post

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड , सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड , सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड , सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133869

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697