निवडीमध्ये महिला ग्रामपंचायत अधिकार्यांना संधी
दक्षिण सोलापूर..
दक्षिण सोलापूर तालुका
संघटटनेचे DNE-136 शाखेची माजी जिल्हा सरचिटणीस मा. डी. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक गुलाबचंद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणी निवड करण्यात अली. दक्षिण तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकार्यांची
सभा ७ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी दक्षिण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये रमेश गायकवाड यांची तालुकाध्यक्षपदी तर श्रीमती सुनीता राठोड यांची उपाध्यक्ष तसेच सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर मा.जिल्हा सरचिटणीस डी. एम. पाटील तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारीणीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीने ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे संघटन अधिक सक्षम करणे, अधिकारी वर्गाच्या सेवाविषयक प्रश्नांचा प्रभावीपणे पाठपुरावा करणे, सदस्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने कार्य करणे तसेच संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन कार्यकारीणी याप्रमाणे..
कार्याध्यक्ष : देवेंद्र कोरे,
कोषाध्यक्ष : मनीषा पाटील
सहसचिव : ज्ञानेश्वर कोळी
संघटक : अशोक म्हेत्रे , गुलाबचंद शहा
महिला संघटक : शोभा नरोळे
प्रसिद्धी प्रमुख : बी. व्ही. वडरे
कायदेशीर सल्लागार : शिवराज राठोड
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













