Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार, इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 8, 2026
in सोलापूर
0
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विद्यार्थ्यांमधील  इंग्रजी भाषेचे न्यूनगंड होणार दूर

दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्याची विद्यार्थ्यांना लागणार सवय

दक्षिण सोलापूरः
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विदयार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विकासासाठी व इंग्रजी अध्यापन वृध्दींगत करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी जिल्हा परिषद शाळांना नवोपक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सर्व मुख्याद्यापकांना  परीपाठ , फलक लेखन , वर्तमानपत्र वाचन,दैनंदिन संभाषण यासाठी इंग्रजी विषयाचा अधिकाधिक वापर करून  शाळा रॅंकींग स्पर्धा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच
फाईव्ह स्टार दर्जा प्राप्त शाळांना “Five Star School” म्हणून घोषित करून अशा शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व वि‌द्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांचा आदर्श इतर शाळांसमोर ठेवण्यात येणार आहे.

       दक्षिण सोलापूर तालुका हा बहुभाषिक तालुका असून तालुक्यातील अनेक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड असल्याचे आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्ययन करताना विविध भाषिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . परिणामी इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊन त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच पुढे उच्च शिक्षण घेताना, इंग्रजी माध्यमातील वि‌द्यार्थ्यांशी स्पर्धा करताना त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेब‌द्दल आवड निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्याची सवय लागावी या उ‌द्देशाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवोपक्रम नियमितपणे राबविण्यात यावेत, अशा सूचना दिल्या आहेत.

 इंग्रजीमध्ये परिपाठ सादरीकरण :
परिपाठामध्ये दररोज एक विद्यार्थी किमान एक मिनिटांचे इंग्रजी भाषण, राष्ट्रीय नेत्यांची माहिती, सुविचार, बातमी किंवा छोटेखानी संवाद सादर करण्यास प्रोत्साहित करावे. सदर उपक्रमाचे छोटे व्हीडीओ तयार करावेत.
इंग्रजी फलक लेखन :
दर शनिवारी शाळेतील प्रदर्शनी भागावरील फलक लेखन इंग्रजीमध्ये करावे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच दरदिवशी प्रत्येक वर्गामधील फलकावरील सुविचार मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये लिहावा जेणेकरुन विदयार्थ्यांना भाषांतराबाबत ज्ञान मिळू शकेल.
इंग्रजी वर्तमानपत्र वाचन :
प्रत्येक शाळेत किमान एक इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्ध करून द्यावे. जेणेकरुन वि‌द्यार्थ्यांकडून वर्तमानपत्र वाचन, शब्दसंग्रह वाढविणे व बातमी सादरीकरण यांचे आयोजन करावे. प्रत्येक विदयार्थ्यास शब्दसंग्रहासाठी स्वतंत्र वही करण्याच्या सुचना दयाव्यात व दर शनिवारी किमान 10 शब्द लिहून घ्यावेत.
दैनंदिन इंग्रजी संभाषण:
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या प्रमाणात साधे इंग्रजी संभाषण करण्यास प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांनीही वि‌द्यार्थ्यांशी दैनंदिन संवादात सोप्या इंग्रजीचा वापर करावा.
इंग्रजी स्टार रैंकिंग योजनाः
शाळेतील एकूण पटसंख्येच्या तुलनेत इंग्रजीमध्ये साधे संभाषण करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार स्टार रैंकिंग प्रदान करण्यात यावे.

20% ः One Star School
40%  ःTwo Star School
60%ः    Three Star School
80%ः four Star School

100% विद्यार्थी-Five Star School

चौकट…

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार

….

बहुभाषिक दक्षिण तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाचे आवड निर्माण करून दैनंदिन वापर करण्यासाठी दक्षिण पंचायत समितीने नवीन उपक्रम सुरु केला आहे. बीडीओ मनोज राऊत व सर्व पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे. यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मदत होईल.

संदिप टेळे, सभापती, दक्षिण सोलापूर

..,,,

…..

फाईव्ह स्टार शाळा घोषित करणार

…..

सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी वरील उपक्रम प्रभावीपणे राबवून विदयार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विकासासाठी इंग्रजी अध्यापन वृध्दींगत करावे. तसेच फाईव्ह स्टार दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळांना  “Five Star School” म्हणून घोषित करण्यात येणार असून अशा शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व वि‌द्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांचा आदर्श इतर शाळांसमोर ठेवण्यात येणार आहे.

मनोज राऊत, बीडीओ, दक्षिण सोलापूर 

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड , सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

Next Post

राजकारणला रामराम , एमके यांचा व्यवसायाला पसंदी !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
राजकारणला रामराम , एमके यांचा व्यवसायाला पसंदी !

राजकारणला रामराम , एमके यांचा व्यवसायाला पसंदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133894

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697