YO BYKES वाहन क्षेत्रातही दिसणार एमके ब्रॅंड
लक्ष्मीकांत एंटरप्रायझेसमधून कोगनूरे यांचा वाहनक्षेत्रात एंट्री
दक्षिण सोलापूर :
राजकारण लय वंगाळ हाय! चांगल्या माणसांना राजकारणात यश मिळत नाही. याची प्रचिती आल्याने समाजकार्यात अग्रेसर असणारे व जळीतग्रस्तांसाठी देवदूत ठरलेले एमके अर्थात महादेव कोगनूरे यांनी राजकारणाला रामराम करीत व्यवसायाला पसंदी दिली आहे. सागर सिमेंटला बाजारपेठेत ओळख निर्माण करून दिल्यावर व “अतिथी प्युअर व्हेज”ला ग्राहकांची अधिक पसंदी मिळाल्याने जनसेवक एमके यांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळविला आहे. YO BYKES वाहनाचे शोरूम सुरु करून त्यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे वाहन क्षेत्रात एमके ब्रॅंड दिसणार आहे.

महाराष्र्टात सागर सिमेंटचे ब्रॅंड करून मार्केटमध्ये नावारूपास आणले. तसेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणार्या भाविकांना तृप्त करण्यासाठी “अतिथी प्युअर व्हेज” नावारुपास आणले. दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाल्यानंतर ग्राहकांची मागणी व पसंदी पाहून पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जनसेवक महादेव कोगनुरे यांनी YO BYKES क्षेत्रात पदार्पण केला आहे.
महादेव कोगनूरे यांनी सागर सिमेंटच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. जळीतग्रस्तांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना वह्या व सायकल वाटप, भांडी वाटप, निराधरांना भोजन या माध्यमातून दक्षिण सोलापूरात एमके ब्रॅंड घराघरात पोहोचला. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढविले. मात्र त्यात त्यांना अपयश मिळाले. त्यामुळे त्यांनी राजकारणाला रामराम करीत हाॅटेल व वाहन क्षेत्रात एंट्री केली आहे.
पुत्र लक्ष्मीकांत यांच्या नावाने ‘लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES इलेक्ट्रिक दुचाकी शोरूम’ चे उद्घाटन मार्गदर्शक गुरुवर्य माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डाॅ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वापर काळाची गरज असल्याचे सांगून कोगनूरे परीवारास यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महादेव कोगनुरे, त्यांचे सहपरिवार, नातेवाईक, सागर सिमेंटचे अधिकारी, अतिथी प्युअर व्हेजचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

….
चौकट
….
वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर कमी खर्च, अत्यल्प देखभाल आणि प्रदूषणमुक्त प्रवासामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर YO BYKES ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणार आहे .
लक्ष्मीकांत कोगनूरे, प्रमुख , लक्ष्मीकांत एंटरप्रायझेस
….
नव्या व्यवसायात काम करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. संधी दिल्याबद्दल सिमेंट क्षेत्रातील मार्गदर्शक आणि YO BYKES चे सोलापूर जिल्हा वितरक बाळासाहेब मुंदडा यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे . ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्राधान्य देणार आहे . ”
महादेव कोगनूरे, जनसेवक तथा संस्थापक अध्यक्ष,
एमके फाउंडेशन
….
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













