BSPL बणगार समाज प्रीमिअर लीगचे थाटात उद्घाटन
सोलापूरः
बणगार (रंगारी) समाज श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री शंकरलिंग बणगार युवक संघटनेच्या वतीने एमआयडीसी येथील ऋतुराज स्पोर्ट्स येथे आयोजलेल्या BSPL बणगार समाज प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योजक प्रदीप मोटगी हे होते. गुरुवार पेठेतील श्री शंकरलिंग बणगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात . त्याचप्रमाणे समाजातील सर्व युवकांना एकत्रित आणण्याकरिता व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रथम वर्षीच या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
१० क्रिकेट संघ या मॅच मध्ये सहभागी झाले आहेत . यावेळी श्री शंकरलिंग बणगार समाजाचे अध्यक्ष संगमनाथ बागलकोटी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व डॉ.संतोष शिंपी (दंतरोग तज्ञ),डॉ. शिरीष तुंबळ (अस्थिरोग तज्ञ) यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. यावेळी नगरसेवक प्रविण दर्गोपाटील , प्रेम मोटगी, धनराज थळंगे, सुरेंद्र शिंपी, सुरेश बाबानगरे ,शंकर पावरगी, जितेंद्र बागलकोटी, राजू तोळणुरे, संजीवकुमार बागलकोटी, श्रीशैल घुळी, प्रकाश शिंपी, धनराज मोटगी, सोमशेखर गोकावी, अजिंक्य मोटगी, संजय धनशेट्टी
व शंकरलिंग युवक संघटनेचे अध्यक्ष विनय बागलकोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूर मणुरे यांच्या संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













