Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“गुळव्वा” मातीतून जन्मलेला आनंदोत्सव – सोलापूरच्या सीमेवरचा अनोखा बालसण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 11, 2026
in सोलापूर
0
“गुळव्वा” मातीतून जन्मलेला आनंदोत्सव – सोलापूरच्या सीमेवरचा अनोखा बालसण
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुळव्वा सणात माती, गाणी आणि बच्चेकंपनीचा धिंगाणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील माती-निसर्गाची अनोखी लोकपरंपरा

सोलापूर…
गुळव्वा ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात विशेषतः सोलापूर, अक्कलकोट आणि लगतच्या कन्नड – मराठी भाषिक गावांमध्ये आषाढ महिन्यात साजरी केली जाणारी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरा आहे. माती, निसर्ग आणि शेती संस्कृतीशी एकोपा दर्शवणारा हा सण प्रामुख्याने लहान मुलांचा आणि आनंदाचा सण मानला जातो.
 हा खेळ किंवा परंपरा नागपंचमीच्या सणाआधी येणाऱ्या चार मंगळवारी किंवा विशिष्ट दिवसांमध्ये ग्रामीण भागात साजरी केली जाते. गावातील लहान मुले आणि बच्चेकंपनी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने या परंपरेत सहभागी होतात.
ग्रामीण भागात लहान मुले शेतातील काळी माती आणून त्यापासून लहान-लहान बैल, नागोबा किंवा मानवी आकृतींसारख्या खेळण्यांच्या मूर्ती तयार करतात. या मातीच्या रचनेला स्थानिक भाषेत ‘गुळव्वा’ असे म्हटले जाते.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260811-WA0055.mp4

चारही आठवडे या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. मुले एकत्र जमून पारंपरिक गाणी गातात. या सणादरम्यान मुले गावोगावी फिरताना विशिष्ट लोकगीते किंवा कन्नड -मराठी मिश्रित घोषणा देतात.
     “गुळवन मन्ना तरलीला…” (म्हणजे गुळव्वा करण्यासाठी माती आणायला गेलो होतो) अशी गाणी म्हणत मुले शेतातून माती आणतात आणि घरात आनंदोत्सव साजरा करतात. हे गाणे या परंपरेचे मुख्य आकर्षण आहे.
नागपंचमीच्या आधी किंवा नागपंचमीच्या दिवशी या सर्व मातीच्या ‘गुळव्वा’ मूर्तींचे अत्यंत उत्साहात, गाणी म्हणत आणि नाचत शेतजमिनीत किंवा पाण्याच्या स्त्रोताजवळ विसर्जन केले जाते.
मातीतून जन्माला आलेली ही गुळव्वा पुन्हा मातीत विसर्जित करून, पुढील सुगीच्या आणि शेतीच्या हंगामासाठी निसर्गाचे आभार मानले जातात. ही परंपरा सीमावर्ती भागातील दोन्ही राज्यांची संस्कृती, भाषा आणि ग्रामीण जीवन किती एकमेकांत मिसळलेले आहे, याचे उत्तम उदाहरण आहे.


…
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

लाभार्थ्यांपेक्षा लिपिक महत्वाचे? कागदावरच वसतिगृहे, फाईलीतच विद्यार्थी , समाजकल्याण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप

Next Post

“पीएसआय राजकुमार डांगे” यांची कोल्हापूर पोलीस कर्तव्य मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“पीएसआय राजकुमार डांगे” यांची कोल्हापूर पोलीस कर्तव्य मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी

"पीएसआय राजकुमार डांगे" यांची कोल्हापूर पोलीस कर्तव्य मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697