Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

सभापती व पंचायत समिती सदस्यांचा एकमुखी ठराव

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 16, 2026
in सोलापूर
0
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बैठकीत  पाणी – चारा टंचाईचा घेतला आढावा

दक्षिण सोलापूर… पावसाळा सुरू होऊन चार महिने होत आले तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. शिवाय अनेक ठिकाणी तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यात पाणी आणि चारा टंचाई समस्या निर्माण झाली असून, तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.
पंचायत समिती सभापती संदीप टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य बलवान गोतसुर्वे, मळसिद्ध मुगळे, पंचप्पा धनशेट्टी, सदस्या अंबिका पाटील, शिल्पा बिराजदार, प्रियंका खुबसंगे, अंबिका दुपारगुडे तसेच गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहायक गटविकास अधिकारी सनी चव्हाण यांच्यासह पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील वीज वितरण, जीवन प्राधिकरण, आदिवासी प्रकल्प, आर.बी.एस.के., लघु पाटबंधारे, बांधकाम, शिक्षण, कृषी, उमेद, ग्रामपंचायत, घरकुल, समाजकल्याण, संजय गांधी निराधार योजना आणि पाणीपुरवठा आदी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्यामुळे विहिरी व कुपनलिकामधील पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई समस्या निर्माण होत आहे म्हणून तालुक्यातील हात पंपांची दुरुस्ती व पाणी तपासणी करण्याचे आदेश सभापती यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘उमेद’ महिला बचत गटातील लाभार्थींना बँक कर्ज, समुदाय गुंतवणूक निधी व वैयक्तिक व्यवसाय कर्ज अशा विविध माध्यमातून एकूण ३८ लाख रुपयांच्या निधीची मंजुरीपत्रे सभापती व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा वास्ते, कनिष्ठ सहाय्यक जिलानी अंसारी, पंचायत समितीचे विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

तात्काळ दुष्काळ जाहीर करा

दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन महिन्यापेक्षा अधिक दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तालुक्यातील उडीद, मटकी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन यासारखी पिके करपून चालली आहेत. ओलाव्याअभावी पिके जळून जात आहे. शिवाय उसासह फळबागांना कडक उन्हामुळे पाणी देणे मुश्किल झाले आहे . त्यामुळे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावे .

संदीप टेळे, सभापती ,
पंचायत समिती , दक्षिण सोलापूर
…

…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

Next Post

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135290

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697