शिक्षकांच्या प्रश्नावरून माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना घेरले;
अखेर उपाध्यक्षांना करावी लागली मध्यस्थी!
सोलापूर : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर लोकप्रतिनिधींचा संयम सुटला. मंद्रूप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते आणि त्यांचे पती प्रशांत कडते यांनी बुधवारी सकाळी अचानक जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मांडल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तारांबळ उडाली.
जिल्हा परिषद सदस्या कडते यांनी शिक्षकांच्या अडचणीं बाबत वारंवार शिक्षणाधिकारी जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र प्रत्येक वेळी टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या कडते दाम्पत्याने थेट कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
शिक्षणाधिकारी जगताप यांनी त्यांना कार्यालयात नेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कडते यांनी “आधी शिक्षकांची कामे करा, मगच कार्यालयात येऊ” अशी ठाम भूमिका घेतल्याने जगताप यांची चांगलीच तारांबळ उडाली.
यापूर्वी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनीही जगताप यांच्या कारभारा विरोधात आंदोलन केले होते. अनेक लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटनांनी सीईओ आणि अध्यक्षांकडे तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने शिक्षण विभागा विषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासक राजवटीत मनमानी कामकाज करणारे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे राज्य आल्यानंतरही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
कार्यालयासमोर जि.प. सदस्यांचा ठिय्या!
या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कडते आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठक घडवून आणली. शिक्षकांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवतो, असे आश्वासन जगताप यांनी दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शिक्षकांच्या प्रश्नासाठी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना चर्चेसाठी कार्यालयाबाहेर आणल्या बद्दल जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व प्रशांत कडते यांचे शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.













