१७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर …जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा -२०२६’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक सिईओ कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शना खाली हे अभियान राबविणेत येत आहे.
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” हे वार्षिक अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” अशी आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण स्वच्छता आणि लोकांचा सक्रिय सहभाग हा आहे. तालुक्यातील अडचणीची, अस्वच्छ व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून, त्यांचे नकाशीकरण (Mapping) करावे आणि निश्चित कालावधीत ती पूर्णपणे स्वच्छ करावीत. शाळांमध्ये “स्वच्छता ज्ञान यात्रा”, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि “स्वच्छता आणि जल संचय संवाद” यांसारखे उपक्रम राबवून जागृती करावी. सफाई कामगारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. त्यांना पीपीई किट्स व सुरक्षा साधनांचे वाटप करून स्थानिक पातळीवर त्यांचा गौरव करावा.
कचरा वर्गीकरण मोहीम, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पर्यटन दिननिमित्त विशेष उपक्रम घ्यावेत. तसेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष बैठकांचे आयोजन करावे. १ ऑक्टोबर रोजी देशव्यापी “एक दिन, एक घंटा, एक साथ” या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक. श्रमदानाचे आयोजन करावे.
“Waste to Wealth” (कचऱ्यातून संपत्ती) व “Waste to Art” (कचऱ्यातून कलाकृती) या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवावेत.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ हे अभियान सर्व तालुक्यात पूर्ण क्षमतेने, वेळेत आणि यशस्वीपणे राबविण्यात यावे.अभियानच्या अंमलबजावणीसाठी व यशस्वीतेसाठी त्वरित कार्यवाही सुरू करावी. असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.














