कला शिक्षक संघाचे तहसीलदारांना निवेदन
दक्षिण सोलापूर:
SIR विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत नोटीसा व सुनावणी आणि शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एकाच कालावधीत आल्याने सुनावणी तारीख २ ऑक्टोबर तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती नंतर ठेवण्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले,राज्य सहसचिव शांतप्पा काळे व जिल्हा सचिव संतोष धारेगाव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याची शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) दि. २८ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ७.५० लाख विद्यार्थी तर सोलापूर जिल्ह्यातून २६ हजार विद्यार्थी बसले आहेत. सोलापूर विभागातील बहुतांश कला शिक्षक BLO म्हणून SIR चे काम करत आहेत. तसेच त्यांचेच स्वतःचे विद्यार्थी या ग्रेड परीक्षेला बसलेल आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन महत्त्वाची शासकीय कामे आल्याने कला शिक्षकांवर ताण येणार आहे. कला क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत यासाठी दक्षता घ्यावी असे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पत्र आहे.
कला शिक्षक हा कला क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असून तो २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान ग्रेड परीक्षेच्या केंद्रावर व्यस्त असेल तर त्यांना SIR च्या नोटीसा वाटप व सुनावणीला उपस्थित राहणे शक्य होणार नाही.
2 ऑक्टोंबर गांधी जयंती नंतर कला शिक्षकांना ग्रेड परीक्षेच्या कार्यातून सुट्टी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपल्याने ते SIR चे सुनावणी घेण्यासाठी सहकार्य करू शकतात. त्यामुळे 2 ऑक्टोबर गांधी जयंती नंतर सुनावणी घेण्याची मागणी कलाशिक्षक संघाने केली आहे.
_______________________
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294












