Saturday, September 26, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

मंद्रूप पोलिसांचा व्हिडिओ अवश्य पहा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 25, 2026
in सोलापूर
0
“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणरायाने आणला मंद्रूप पोलिसांमध्ये जोष !

25 वर्षानंतर प्रथमच मंद्रूप पोलीस ठाणे येथे गणेशोत्सव साजरा

सोलापूर:
महिन्यापूर्वी मंद्रूप पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर  उपविभागीय पोलीस  अधिकारी गणेश शिंदे यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई सुरू केल्याने मंद्रूप पोलिस ठाणे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य दिसत
आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रथमच 25 वर्षानंतर मंद्रूप पोलीस ठाणे येथे गणरायाची प्रतिष्ठापना केली. दररोज पूजा आरती करण्यात आल्यानंतर अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगी ताशाच्या तालावर मनमुराद नृत्य केले. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे सर्व कर्मचारी यांनी गणरायासमोर हलगी व ताशाच्या तालावर पारंपरिक नृत्य केला. गणरायासमोर कोणतेही पद व प्रतिष्ठा न मानता सर्व अधिकाऱ्यांनी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260925-WA0108.mp4


गणेशोत्सवाचा थाट आणि त्यात हलगी-ताशाचा कडकडाट म्हटल्यावर पाय आपोआप थिरकायला लागतात. नेमका असाच एक प्रकार मंद्रूप पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी दिसून आला
. सकाळच्या सत्रात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हजेरी झाल्यानंतर अचानक पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी गणरायाचे मिरवणूक काढण्याचे ठरविले . त्यानुसार गावातील हलगी व ताशा मागवण्यात आले. यावेळी गणरायासमोर नृत्य करून
डॉल्बी विना मिरवणुकीचे समाजासमोर आदर्श निर्माण केले.
दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीचा रुबाब राखत थेट हलगीच्या तालावर ठेका धरला. यावेळी
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे आणि अमितकुमार करपे यांच्यासह संपूर्ण पोलीस फौज फाटा अत्यंत उत्साहात डान्स करताना दिसून आले . कडक ड्युटी आणि ताणतणाव बाजूला ठेवून, बाप्पाच्या निरोपावेळी अधिकाऱ्यांनी केलेल्या डान्समुळे कौतुक होत आहे.

___________________

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

“२५ वर्षा”नंतर पोलिसांनी धरला हलगीच्या तालावर ठेका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

“२५ वर्षा”नंतर पोलिसांनी धरला हलगीच्या तालावर ठेका

September 25, 2026

September 25, 2026
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती दान करा… जिल्हाधिकारी

September 25, 2026
गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

September 25, 2026
सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139978

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697