दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
सोलापूर … जिल्ह्यात सरासरी ४५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. काही मध्यम प्रकल्पांमध्ये तर १० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे तसेच नागरिकांनी गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.. 
जिल्ह्यात कमी पाणीसाठा असलेल्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास पाणी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. कमी पाणीसाठा असलेल्या ठिकाणचे पाणी पुढील सहा ते सात महिने वापरता येणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी गणेश विसर्जनाबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
गणेश विसर्जनासाठी शक्य असल्यास छोटा कुंभ किंवा पात्र तयार करून त्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे आणि त्या पाण्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करावा. पर्यावरणाचे तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी गणेश मंडळे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आवाहन केले आहे.
___________________
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294











