Tuesday, September 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 22, 2026
in सोलापूर
0
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद .. ना.चंद्रकांत पाटील

सोलापूर : अंगणवाडी सेविका या केवळ सेविका नसून बालकांच्या संगोपनात व सर्वांगीण विकासात मातृत्वाची भूमिका बजावत आहेत. समाजाची पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवछत्रपती रंग भवन येथील सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अंगणवाडी सेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात २५ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपा शहराध्यक्ष व नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शिक्षणाधिकारी धनंजय ढेपे,
प्रशांत फत्तेपूरकर, शशिकांत चव्हाण, बाल विकास अधिकारी दीपक ढेपे यांच्या सह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
ना . चंद्रकांत पाटील म्हणाले की, अंगणवाडी सेविका बालकांच्या पोषण, संगोपन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पुढील पिढीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सक्षम होतो. महिला व बालकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
संयोजक मोहन डोंगरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करताना, बालकांच्या संगोपनासह पोषण आणि सामाजिक जडणघडणीत त्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.

…………………….
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

Next Post

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला "सुभेदार मल्हारराव होळकर" नाव द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139004

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697