सीईओंच्या आदेशाला केराची टोपली!
दक्षिण सोलापुर बांधकाम विभागाची जोरदार चर्चा
निकृष्ट कामांचा आराखडा करून लाखोंचा विकास कामांचानिधी सुरू करण्याचा खटाटोप ?
सोलापूर: जिल्हा परिषदेचे
सीईओ कुशल जैन यांनी बदल्यांचे आदेश काढून दोन महिने झाले, तरी दक्षिण सोलापूरचे शाखा अभियंता विलास कोंडगुळे हे अजूनही आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. बदली होऊनही कामकाज सुरूच ठेवल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी सीईओ
कुशल जैन यांनी दोन महिन्यापूर्वी पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये शाखा अभियंता विलास कोंडगुळे यांची दक्षिण सोलापूर बांधकाम विभागातून थेट जिल्हा परिषद मुख्यालयात बदली करण्यात आली होती. मात्र, बदली होऊनही कोंडगुळे यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. उलट, दक्षिणमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामांचे आराखडे बनवणे आणि मोजमाप पुस्तिका (MB) तयार करण्याचे काम त्यांनी वेगाने सुरू केल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दक्षिणचा “अतिरिक्त पदभार” ठेवण्याचे विनंती केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी बदली झालेल्या कोंडगुळे यांना त्वरित मुख्यालयात हजर करून घ्यावे , अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
या प्रकरणी दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत आणि उपअभियंता शरद उंबरजे यांच्याकडे तक्रार करून कोंडगुळे यांचा पदभार काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडीओ राऊत यांनी कोंडगुळे यांचे पदभार काढण्याविषयी उप अभियंता उंबरजे यांना आदेश दिला आहे. मात्र उपअभियंता उंबरजे हे बघ्याची भूमिका घेऊन शाखा अभियंता कोंडगुळे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
कोंडगुळे हे पदभार सोडण्याच्या घाईगडबडीत निकृष्ट दर्जाच्या कामांचे आराखडे तयार करत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सीईओ कुशल जैन यांनी यात तात्काळ लक्ष घालून शाखा अभियंता कोंडगुळे यांचा दक्षिण मधील अतिरिक्त पदभार काढून त्यांना मुख्यालयात हजर करून घ्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
…………………..
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294












