विंचूरच्या देवकते कुटुंबाला एम. के. फाउंडेशनचा मदतीचा हात
दक्षिण सोलापूर ..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी सकाळी देवकते कुटुंबीयांच्या घरात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत राहते घर आणि संपूर्ण संसार क्षणात खाक झाला. संसारोपयोगी सर्व साहित्य, कपडे, धान्य जळून खाक झाल्याने देवकते कुटुंब उघड्यावर पडले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जळीतग्रस्त देवकते कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तू सुपूर्द करून मोठा दिलासा दिला.
“देवकते कुटुंबावर कोसळलेले संकट अत्यंत मोठे आहे. एका क्षणात त्यांचा संसार आगीत खाक झाला. मी माझ्या परीने मदत केली आहे, पण या कुटुंबाला पुन्हा उभे करण्यासाठी मोठ्या आधाराची गरज आहे. दक्षिण सोलापूरातील सर्व दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक संस्थांनी देवमाणूस बनून या कुटुंबाला मदत करावी, असे आवाहन
महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
महादेव कोगनुरे यांच्या या तत्पर मदतीमुळे जळीतग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, एम. के. फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
…….,…….
आपल्या हक्काचे व्यासपीठ
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














