Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 17, 2026
in सोलापूर
0
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात

सोलापूर –
जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात करीत सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. या अभियानाचा शुभारंभ नूतन ३३२ शिक्षकांना जागेवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन सुरुवात केली. सामान्य प्रशासन विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण या उमेदवारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे हस्ते नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करणेत आला.

   यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचं सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अमृता वाघे, कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ प्रमुख उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन सोलापूर जिल्ह्यात या सेवा संकल्प अभियानाचे विशेष नियोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा कार्याचा या निमित्ताने गौरव होत असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संकल्प सेवा अभियानाबरोबर २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता महा श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातील घटकांची चार सप्ताहात प्रभावी अंमलबजावणी करा. असे आवाहन सिईओ कुशल जैन यांनी केले.
ग्रामविकास व पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकास विभागाने दिलेले सुचना चार सप्ताहात विशेष सेवा द्या. सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणीस गती द्या. स्वच्छता ही सेवा २०२६ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन जलसंधारणाची कामे हाती घ्या असे आवाहन सिईओ जैन यांनी केले. शिक्षण विभागातील ३३२ शिक्षकांचे समुपदेशन घेऊन नियुक्ती देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात केला आहे,ही अभिमानास्पद बाब असल्याचे सिईओ जान यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेवा कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यात चांगली सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाली. माझा विभागाने केलेली सुरुवात मनाला समाधान देणारी आहे. मार्डी व बिबीदारफळ सारख्या गावांचा स्वच्छतेचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले. शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश वितरण करण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाधिकारी विशाल मुळे व त्यांचे टीमने समुपदेशन घेऊन पारदर्शी पध्दतीने ही नियुक्ती देणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकंत भुजबळ यांनी आभार मानले.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

Previous Post

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136444

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697