महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन
पदाधिकारी निवड जाहीर
सोलापूर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन यांच्या वतीने ट्रॉय पब्लिक स्कूलचे संस्थापक सचिव श्रीकांत भरले यांची दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, संघटनात्मक कार्याचा अनुभव तसेच शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांबाबत असलेली तळमळ व सक्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शैक्षणिक संस्था व संस्थाचालकांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी व प्रश्न शासनस्तरावर प्रभावीपणे मांडणे तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे हे या असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरीष शिंदे ,प्रदेश सचिव गणेश नीळ , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष वलगे,सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे , जिल्हा सचिव शरद अनंतकवळस तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णदेव मदने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अनेक संस्थाचालक उपस्थित होते .
श्रीकांत भरले यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचालक व शिक्षकवर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.













