कंदलगावात घरफोडी करून
सहा लाखांचा मुद्देमाल लंपास
दक्षिण सोलापूर..
…
बुधवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री 12/30 वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार इसमांनी महादेवी गौरप्पा कोरे , राहणार कंदलगाव यांच्या शेतातील वस्तीवर जाऊन जबरदस्तीने घराचा दरवाजा उघडून फिर्यादी व त्यांची आई भौरवा यांना काठीने व लाथा बुक्क्याने मारहाण केला. फिर्यादी यांची आई भौरवा यांना चाकूने मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण दोन लाख 48 हजार रुपयाची चोरी केली . तसेच रेवप्पा बुद्धाप्पा घोडके यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून काठीने व सळईने मारहाण करून त्यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण तीन लाख 62 हजार रुपयाची चोरी केली आहे. चार अज्ञात इसमानी फिर्यादी व त्यांची आई भौरवा यांना मारहाण करून तसेच रेवप्पा बुद्धाप्पा घोडके यांच्या घरातील लोकांना मारहाण करून तीन लाख 60 हजार असे एकूण सहा लाख दहा हजार रुपये किमतीची चोरी केली आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेवी गौरप्पा कोरे, वय ५० वर्षे रा. गुंजेगाव रोड , कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे तपास करीत आहेत.
………………..
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.













