Saturday, September 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

दोन मान्यवरांचा श्रीलंकेतील कोलंबोत होणार सन्मान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 19, 2026
in सोलापूर
0
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!
0
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूरच्या महास्वामीजी आणि जेऊरच्या प्रा. गायत्री बिराजदार यांना ‘द ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड 2026’ जाहीर

सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षण, समाजसेवा, धार्मिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जिल्ह्यातील दोन मान्यवरांना श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वेळापूर (ता. माळशिरस) येथील बृहन्मठाचे श्री ष.ब्र. १०८ सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी आणि जेऊर (ता. अक्कलकोट) येथील श्री काशीविश्वेश्वर प्रशालेच्या प्रा. गायत्री बिराजदार यांना प्रतिष्ठेचा ‘द ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ जाहीर झाला आहे.


या असोसिएशनच्या वतीने 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथील पेगासस रीफ येथे भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांचे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रात  भरीव योगदान आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि गुरुकुलाच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य तसेच गरजू नागरिकांना अन्न, वस्त्र आणि विवाहासाठी मदत करण्याचे कार्य ते करत आहेत.
प्रा. गायत्री बिराजदार या गेल्या 16 वर्षांहून अधिक काळ ग्रामीण व सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. तब्बल 12 वर्षे विनामूल्य शिक्षणसेवा देऊन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवली आहे.
जिल्ह्यातील दोन्ही मान्यवरांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने सोलापूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

___________________________

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

Next Post

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137622

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697