Tuesday, September 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाला लॅपटॉप-सिम परत

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 21, 2026
in सोलापूर
0
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,
0
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले!

 

आकृतिबंध रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही – कृषी सेवा संघटनेचा ठाम निर्धार


सोलापूर.. शासनाच्या नव्या आकृतिबंधाच्या विरोधात कृषी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले “लॅपटॉप परत, सिमकार्ड परत” आंदोलन आता चिघळले आहे. हा आकृतिबंध रद्द झाल्याशिवाय आंदोलन स्थगित होणार नाही, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र कृषी सेवा व कृषी कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना, कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप व ऑनलाइन कामांसाठी दिलेले सिमकार्ड परत केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याचा थेट परिणाम पीक विमा, दुष्काळ निधी व पीक नुकसानीच्या पंचनाम्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ई-पीक पाहणी, ऑनलाइन पंचनामा, अनुदान वाटप यासारखी सर्व कामे लॅपटॉप आणि सिमवर अवलंबून आहेत. ती यंत्रणाच बंद झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारी मदत लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटात असताना, आता प्रशासकीय कामे ठप्प झाल्याने त्यांचे हाल अधिक वाढले आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या नव्या आकृतिबंधामुळे पदे कमी होणार, कामाचा बोजा वाढणार आणि पदोन्नतीचे मार्ग बंद होणार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. शासनाने तात्काळ हा आकृतिबंध रद्द करून तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

…………………….
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

Next Post

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139000

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697