Monday, September 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 21, 2026
in सोलापूर
0
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

५२ गावांचा कारभार कृषी, शिक्षण, अंगणवाडी अधिकाऱ्यांकडे!

दक्षिण सोलापूर.. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत न झाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यात अखेर “प्रशासक राज” सुरू झाले आहे. तालुक्यातील तब्बल ५२ ग्रामपंचायतींचा कारभार विविध विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी काढला आहे. शासनाच्या निर्देशानुसार, पंचवार्षिक मुदत संपलेल्या आणि यापूर्वी सरपंच प्रशासक असलेल्या तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींवर नव्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     सरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती, ती मुदतही संपल्याने आता पुढील सहा महिने हा कारभार अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.
विशेष म्हणजे, पंचायत विभागासोबतच शिक्षण, कृषी, सांख्यिकी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (अंगणवाडी) विस्तार अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. एका विस्तार अधिकाऱ्याकडे कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त १० गावांचा कारभार सोपवण्यात आला असून, त्यांच्याकडे पंचायत समितीतील त्यांच्या मूळ विभागाचाही पदभार असणार आहे. त्यामुळे अधिकारी गावाकडे लक्ष देणार तरी कसे ? असा सवाल उपस्थित होत आहे. या निर्णयामुळे गावचा कारभार अधिकाऱ्यांच्या हातात गेला असला तरी, प्रत्यक्षात विकास कामांना ब्रेक लागण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे

दक्षिणच्या ५२ गावांचे कारभारी

१. सदाशिव कोळी (विस्तार अधिकारी, पंचायत) .. औराद, होटगी, होटगी स्टेशन, नांदणी, हत्तरसंग, बोळकवठा, राजूर, भंडारकोवठे, हत्तुर, दिंडूर.

२. ज्योतीराम भोसले (विस्तार अधिकारी, पंचायत) .. मुळेगाव, मुळेगाव तांडा, बक्षीहिपरगे, वडजी, वरळेगाव, कुंभारी, तांदुळवाडी, बोरामणी.

३. एस.आर. राठोड (विस्तार अधिकारी, कृषी) …. फताटेवाडी, शिंगडगाव, मद्रे, घोडा तांडा, सिंदखेड,संजवाड, हिपळे.

४. एस.बी. सोलापूर (विस्तार अधिकारी, कृषी) .. तीर्थ, लिंबीचिंचोळी , बोरुळ, हणमगाव, कणबस, यत्नाळ, इंगळगी.

५. श्रीमती.एम.एस. शिंदे (विस्तार अधिकारी, सांख्यिकी) …वडगाव, मुस्ती, संगदरी, पिंजरवाडी, कर्देहळी.

६. ऋषिकेश जाधव (विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना) .. बरुर, टाकळी, वडकबाळ.

७. मल्लिनाथ स्वामी (विस्तार अधिकारी, शिक्षण) – .. माळकोट, कुरघोट, बाळगी, कारकल, लवंगी, सादेपूर.

८. गुरुबाळा सनके (विस्तार अधिकारी, शिक्षण) -.. गुंजेगाव, अकोले (मं.), अंत्रोळी, वडापूर, येळेगाव, तेलगाव .
_______________________

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

Next Post

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

138285

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697