उसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धरणे आंदोलन.
सोलापूर ..
कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर थकीत उसबीलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बेमुदत धरणे आंदोलनास आज सुरुवात झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी, कार्यकर्ते एकत्रित येऊन “ऊस बिल आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं “अशी जोरदार घोषणाबाजी करत कारखाना प्रशासनचा निषेध केला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे , युवा जिल्हा अध्यक्ष मोहसीन पटेल, इकबाल मुजावर, रज्जाक मकानदार, मलखारी उमदी, महेश जाधव, दीपक हजारे, आदिनाथ हजारे, मोहसीन सय्यद यांच्या सह सर्व पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
___________________
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294













