Sunday, September 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

मोबाईलच्या पिंजऱ्यातून पुस्तकांकडे चला !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 26, 2026
in सोलापूर
0
नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील  आर्टिस्ट यशवंत बिराजदार यांनी साकारले मोबाईलचे दुष्परिणाम

सोलापूर –

मोबाईल हाताळतोय की मोबाईलच आपल्याला हाताळतोय? ‘लाईक’च्या नशेत, स्क्रोलिंगच्या सवयीत आणि आभासी जगाच्या मोहात अडकलेल्या समाजाला आत्मपरीक्षणाची जाणीव करून देणारे ६० चित्रांचे विशेष प्रदर्शन टिळक सभागृह आवारात भरविण्यात आले आहे. सोलापूरचे कलाकार यशवंत बिराजदार यांनी साकारलेल्या या चित्रांतून ‘मोबाईल व्यसनातून वाचनाकडे’ असा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
मोबाईलचे ‘बाळकडू’ लहानपणापासूनच मिळत असल्याने खेळण्याचे वय असलेल्या मुलांचे बालपणही मोबाईलमध्ये हरवत आहे. एका चित्रात पक्षी पिंजऱ्याबाहेर, तर माणूस मोबाईलच्या पिंजऱ्यात दाखवून बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. जेवतानाही मोबाईल न सोडणारे कुटुंब, सोशल मीडियातील ‘लाईक-डिसलाईक’मध्ये अडकलेली मानसिकता आणि घातक स्क्रोलिंगचे परिणाम विविध कलाकृतींतून स्पष्ट केले आहेत.

‘पाल्याला मोबाईल दिला म्हणजे जबाबदारी संपली नाही’, ‘तुमचा वेळ अॅप्स घेत आहेत’, ‘लोकांचे स्टेटस पाहण्यापेक्षा आपला स्टेटस वाढवा’, असे संदेश चित्रांमधून देण्यात आले आहेत. मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘फेसबुकवर हजारो आहेत.बुक वाचणारे मात्र दुर्मिळ आहेत’, ‘पुस्तक वाचणारे डोळेच मोबाईल हिरावून घेत आहे’, अशा आशयाच्या चित्रांमधून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘यंत्रे माणसाळली पण माणूस बिघडला’ या वास्तवाची जाणीव करून देत ‘फक्त मी नाही, आपण बाहेर पडू या’ असा संदेश प्रदर्शनातून देण्यात आला आहे.
=================

Previous Post

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Next Post

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

September 27, 2026
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

September 27, 2026
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

September 27, 2026
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

September 27, 2026
नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

September 26, 2026
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

September 26, 2026
बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

September 26, 2026
“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

141169

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697