Sunday, September 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

कॅनॉलच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांचा एल्गार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 27, 2026
in सोलापूर
0
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”
0
SHARES
253
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 जलसंधारण विभागाच्या मनमानीविरोधात  कोरे व रमेश नवले यांचे जल-आंदोलन

—
मंद्रूप (दक्षिण सोलापूर) – एकीकडे कंदलगावच्या वरील भागात महिनाभरापासून कॅनॉल दुथडी भरून वाहतोय, आणि दुसरीकडे मंद्रूप-येळेगाव परिसरातील शेतकरी थेंबाथेंबासाठी महिना-महिना वाट पाहतोय! पाटबंधारे विभागाच्या या दुजाभाव व मनमानी कारभाराविरोधात अखेर मंद्रूपकरांचा संताप उफाळून आला. दुष्काळजन्य परिस्थितीत मंद्रूपच्या पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सीतामाई तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी सभापती अप्पाराव (दादा) कोरे व माजी उपसरपंच रमेश नवले यांनी थेट कॅनॉलच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांसह आंदोलन केले.
सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी उरकली. पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने ऊस, कांदा, केळी, पपई , कलिंगड यासह सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग, बाजरी, मुग आणि मक्याची पिके माना टाकू लागली आहेत. तोंडाशी आलेला घास निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही अशी अवस्था असताना कॅनॉलमध्ये पाणी येऊनही  जलसंधारण विभाग गेटला कुलूप लावून बसला आहे. कॅनॉलचे पाणी मिळाले तर पिकांना जीवदान मिळून आणि मंद्रूपचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.
मंद्रूपकरांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या सीतामाई तलावात कॅनॉल मधून पाणी सोडल्यास, तलावातील पाणी शुद्धीकरण करून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. यासाठी १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व जलसंधारण विभागाकडे निवेदन दिले आहे, मात्र एक महिना उलटूनही त्याची दखल घेतली नाही.
कॅनॉलची पाणीपट्टी भरण्यात येत नसल्याचे कारण अधिकारी सांगतात, तर दुसरीकडे मंद्रूप ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार असल्याचे लेखी कळवूनही अधिकारी टाळाटाळ करत आहेत. शासनाचे टेल टू हेड (शेवटून सुरुवात) पाणी सोडण्याचे धोरण असताना, अधिकारी कंदलगाववरील गावांना उच्च दाबाने व अधिक काळ पाणी देतात आणि टेलवरील मंद्रूपला मात्र २-३ दिवस पाणी सोडून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळतात.
लोकप्रतिनिधी व आमदारांनी वारंवार सांगूनही पाणी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

….
सीतामाई तलावात पाणी सोडल्यास मंद्रूपचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. निवेदन देऊनही एक महिन्यापासून अधिकारी दुष्काळात गेटला कुलूप लावून भावनेशी खेळत आहेत. मंद्रूपचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारण विभागाला तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत.

– अप्पाराव (दादा) कोरे, माजी सभापती, मंद्रूप
….
“साठवणच नाही तर पिणार काय?”

 दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पुढील पाण्याची शक्यता नाही. त्यामुळे  याच पाण्याची साठवण करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करता येईल. जलसंधारण विभाग सहकार्य करत नसल्यामुळे कॅनॉलच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार आहे, त्यामुळे लवकरात लवकर अधिक काळ सीतामाई तलावात पाणी सोडावे.

– रमेश नवले, माजी उपसरपंच, मंद्रूप

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

Next Post

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम 'कासव' गतीने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

September 27, 2026
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

September 27, 2026
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

September 27, 2026
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

September 27, 2026
नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

September 26, 2026
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

September 26, 2026
बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

September 26, 2026
“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

141169

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697