Sunday, September 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

उळेच्या आरोग्य मंदिराला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनात ९०% गुण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 27, 2026
in सोलापूर
0
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील ३९ आरोग्य मंदिरे झालीत NQAS ब्रँडेड 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावाने आरोग्य क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे! जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी PHC अंतर्गत येणाऱ्या उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) परीक्षेत तब्बल ९० टक्के गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) रुग्णसेवा, स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध व्यवस्थापन, प्रभावी सेवा वितरण अशा कठोर निकषांवर तपासणी करून हे मानांकन दिले जाते. या परीक्षेत उळे आरोग्य मंदिराने बाजी मारल्याने आता येथील नागरिकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे. हे यश मिळवण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा देशमुख, आरोग्य सेविका कल्पना सावंत, आरोग्य सेवक शुभेंद्र काळे, आशा स्वयंसेविका सत्यभामा साठे, शीतल माळी, फरहाना शेख आणि अर्धवेळ परिचर माधुरी शिंदे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांना NQAS मानांकित करण्याचे उद्दिष्ट सीईओ कुशल जैन यांनी ठेवले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ३९ आयुष्यमान आरोग्य मंदिरांना हे मानांकन प्राप्त झाले आहे. उर्वरित आरोग्य संस्थांचे इन्स्पेक्शन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सीईओ जैन यांनी दिली आहे.

…..

  • संपादक: अमोगसिद्ध मुंजे
  • मोबाईल नंबर: 📞 9423535294
  • न्यूज पोर्टल: नवप्रभात न्यूज पोर्टल
Previous Post

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

Next Post

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

"फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

September 27, 2026
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

September 27, 2026
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

September 27, 2026
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

September 27, 2026
नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

September 26, 2026
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

September 26, 2026
बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

September 26, 2026
“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

141169

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697