Sunday, September 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

खरबरीत रस्ता देतोय अपघातास आमंत्रण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 27, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठेकेदारांकडून संत गतीने काम सुरू, वाहनचालक त्रस्त!

मंद्रूप:
ठेकेदाराचा संथ कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे मंद्रूप -निंबर्गी -भंडारकवठे हा मार्ग सध्या वाहनचालकांसाठी ‘अपघात मालिका’ बनला आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, निष्पाप नागरिकांचे जीव टांगणीला लागले आहेत. सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ज्यामुळे समोरचे वाहन दिसणे कठीण झाले आहे. तसेच नवीन रस्ता करण्या साठी जेसीबी द्वारे रस्त्यावर चर मारण्यात आली आहे त्यामुळे हा रस्ता खरबरीत बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि अर्धवट कामामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.

      ठेकेदाराच्या संथ कामावर नियंत्रण ठेवण्यात संबंधित अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. रोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी आणि रुग्णांना या रस्त्यावरून जाताना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. संबंधित विभागाचे अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

“एखाद्या मोठ्या जीवितहानीची वाट प्रशासन पाहत आहे का ?” ठेकेदाराने नवीन रस्ता बनवण्यासाठी रस्त्यावर चर मारली आहे त्यामुळे अपघात होत आहेत. ठेकेदाराने तात्काळ कामाची गती वाढवून रस्ता वाहतुकी साठी सुरक्षित न केल्यास, रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .

खाजाभाई शेख , वाहन चालक , भंडारकवठे

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
मो. 9423535294

Previous Post

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

Next Post

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

भंडारकवठेत पर्यावरणाची मोठी चळवळ!

September 27, 2026
मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

मंद्रूप-निंबर्गी-भंडारकवठे रस्त्याचे काम ‘कासव’ गतीने !

September 27, 2026
“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

“फुकटचे नाही, हक्काचे पाणी द्या!”

September 27, 2026
वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

वा! सोलापूरच्या आरोग्य सेवेचा डंका राष्ट्रीय स्तरावर!

September 27, 2026
नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

नांदी संमेलन प्रदर्शनातील ६० चित्रांतून मोबाईलच्या अतिवापरावर भाष्य !

September 26, 2026
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

September 26, 2026
बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

बाप रे ! गणेश विसर्जनातून २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन

September 26, 2026
“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

141169

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697