Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘

कार्यकर्त्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आमदार देशमुख घेणार कठोर निर्णय !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 21, 2026
in सोलापूर
0
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘
0
SHARES
958
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आजी व माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

उमेदवारी फाॅर्मवरून दोनही गट आमनेसामने

सोलापूर …
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३ जिल्हा परिषद व ६ पंचायत समिती जागांच्या उमेदवारीवरून आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही गटाकडून भाजपाची उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे एबी फाॅर्म जोडण्यात आल्याने दोनही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. त्यामुळे भाजपाकडून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार ? हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे. मात्र बुधवारी रात्रभर भाजपाच्या पदाधिकार्‍यांची खलबते सुरू राहणार असून यामध्ये कोणत्या उमेदवाराचे नशिब उज्वल ठरणार ? हे स्पष्ट होणार आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत भाजपाने १०२ पैकी ८७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविला आहे. या निवडणूकीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेटी व आमदार देवेंद्र कोठे यांनी उमेदवारी वाटपात आघाडी घेऊन अधिकाधिक कार्यकर्त्यांना व नवख्या उमेदवारांना संधी दिल्याने भाजपाचे अधिक उमेदवार निवडून आले. त्यामुळे पालकमंत्री गोरे हे आमदार सचिन कल्याणशेटी व माजी आमदार दिलीप माने यांच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना दक्षिणमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत संधी दिली आहे. तर दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांच्या निकटवर्तियांची उमेदवारी डावलण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणमधील भाजपा अधिकृत उमेदवारी नावावरून बुधवारी दिवसभर गोंधळ दिसून येत होता. कार्यकर्त्यांवरील अन्यासाठी आमदार सुभाष देशमुख कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दक्षिणमधील तीन जिल्हा परिषद गटापैकी माने गटाने दोन जिल्हा परिषद गटावर उमेदवारी जाहीर केली आहे. तर आमदार देशमुख गटाने तीनही जागांवर उमेदवार जाहीर केला आहे. शिवाय पंचायत समिती निवडणूकीतही एकाच जागेसाठी दोन दोन एबी फाॅर्म दिल्याने भाजपाच्या अधिकृत उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार देशमुख गटाचे उमेदवार विकासनगर येथे ठिया मारून होते. यावेळी आमदारांनी उमेदवारांसाठी पक्षाच्या वरीष्ठांशी आग्रह धरण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आमदार देशमुख अॅक्शन मोडवर असल्याचे सांगण्यात येते. ते काय निर्णय घेतात ? हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.
भाजपासारख्या शिस्तबध्द पक्षाच्या दोनही गटाकडून वेगवेगळे एबी फाॅर्म देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बुधवारी रात्री भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीने अंतिम उमेदवारी यादी प्रसिध्द होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामध्ये कोणत्या गटावरील उमेदवारावर अन्याय होणार ? हे पाहावे लागेल. मात्र पालकमंत्री गोरे, आमदार कल्याणशेटी व माजी आमदार माने हे आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

‘दक्षिण’मध्ये इच्छुक झाले उदंड

Next Post

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697