Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘दक्षिण’मध्ये इच्छुक झाले उदंड

भाजपाच्या उमेदवारी वाटपात गोंधळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 21, 2026
in सोलापूर
0
‘दक्षिण’मध्ये इच्छुक झाले उदंड
0
SHARES
556
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणमध्ये जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी ७३ अर्ज ,
पंचायत समितीच्या १२ जागांसाठी १४५ अर्ज सोलापूर,..
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे निवडणुकीत चुरस दिसून येत आहे. दक्षिण मधील सहा जिल्हा परिषद जागांसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून एकूण ७३ अर्ज दाखल झाली आहेत. तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी शेवटच्या दिवशी ९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून एकूण १४५ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून उमेदवारी दाखल करण्यात आले असून निवडणूकीचा अंतिम चित्र २७ जानेवारीला स्पष्ट होणार आहे .
दक्षिण मध्ये प्रथमच भाजपाकडून एका जागेसाठी दोन दोन एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला . त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

यावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण तहसील कार्यालयासमोर इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी भाजपाकडून उमेदवारी व एबी फॉर्म मिळण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

माजी आमदार दिलीप माने व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी भाजपाचे एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात सादर केले. तर दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयातून दीपक चोपडे यांच्यामार्फत एबी फॉर्म देण्यात आले . त्यामुळे भाजपामध्ये उमेदवारासाठी रस्सीखेच सुरू असताना गटबाजी दिसून येत होती. नऊ वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी बोरामणी १६, कुंभारी ५, वळसंग १२, हत्तूर ३, मंद्रूप ७ व भंडारकवठे ७ अर्ज दाखल करण्यात आले . तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी बोरामणी ६, कुंभारी ७, वळसंग ९, हत्तूर ११, मंद्रूप ८, भंडारकवठे ४, कासेगाव १३, धोत्री ५, होटगी १४, औराद १०, कंदलगाव ९, व निंबर्गी ३ दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी ७३ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी १४५ अर्ज दाखल झाले असून निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र भाजपामधील गटबाजीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

Previous Post

सोलापूरच्या या प्रभागासाठी ‘दादा’ देणार निधी

Next Post

भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘

भाजपा उमेदवारांमध्ये ' सस्पेन्स '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134199

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697