Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरच्या या प्रभागासाठी ‘दादा’ देणार निधी

नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी केला प्रभागाच्या विकासाचा निर्धार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 21, 2026
in सोलापूर
0
सोलापूरच्या या प्रभागासाठी ‘दादा’ देणार निधी
0
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून २० कोटींचा निधी आणणार

सोलापूर … महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या निवडीनिमित्त ‘हत्तुरे वस्ती’ येथे ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. प्रभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून २० कोटी निधी आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक आप्पासाहेब हत्तुरे, शहराध्यक्ष संतोष पवार, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे, वैजिनाथ हत्तुरे, नूतन नगरसेवक वैभव हत्तुरे, जुबेर बागवान, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आप्पासाहेब हत्तुरे म्हणाले की, ” निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे ग्वाही दिली आहे. विकासाच्या जोरावर व जनसंपर्कामुळे वैभव हत्तुरे यांनी मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्यामुळे दादांनी हत्तुरे यांचे अभिनंदन केला. त्यानुसार माॅडेल प्रभाग करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. प्रभागापुरते मर्यादित न राहता, शहराच्या अन्य भागातही पक्ष वाढवण्याचे काम कार्यकर्त्यांनी जोमाने करावे. असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले कि, “सोलापूर शहरात वैभव हत्तुरे यांनी विकासाच्या बळावर विजय मिळविल्याने हत्तुरे कुटुंबाच्या माध्यमातुन राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखली आहे. राजकारणात यश-अपयश येत असते, मात्र वैभव हत्तुरे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी ताकद आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.
या कृतज्ञता सोहळ्याला प्रभागातील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले व जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.

Previous Post

दक्षिणच्या निवडणुकीत ‘दादा’ व ‘मालक’ यांची एंट्री

Next Post

‘दक्षिण’मध्ये इच्छुक झाले उदंड

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘दक्षिण’मध्ये इच्छुक झाले उदंड

'दक्षिण'मध्ये इच्छुक झाले उदंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134198

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697