Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 28, 2026
in सोलापूर
0
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य आराखड्यासाठी  3 हजार 993 कोटी निधी मंजूर

सोलापूर:- राज्य शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य आराखड्यासाठी 3 हजार 993 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर केला आहे. यासाठी शासन निर्देशाप्रमाणे आराखडा तयार करण्यासाठी वास्तूविशारद नियुक्त करणे आवश्यक आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरने पुढील चार दिवसात यासाठीची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री  जयकुमार गोरे यांनी दिले.


नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित  विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखडा पंढरपूर जिल्हास्तरीय समिती बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर कार्यकारी अभियंता अमित निमकर,उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य आराखड्यासाठी वास्तूविशारद नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया करून या आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित वास्तुविशारद यांनी जिल्हास्तरीय समिती समोर सादरीकरण करावे. हे सादरीकरण जिल्हास्तरीय समितीने मान्य झाल्यानंतर त्याविषयीचे सादरीकरण मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर केले जाऊन त्यास मंजुरी प्रदान होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी आराखड्यातील सर्व घटकांसाठी एकूण 3,993.90 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली .या निधीचे घटकनिहाय वाटप पुढीलप्रमाणे: वाकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधांचा विकास 288.66 कोटी, भाविकांना व्यावसायिक संधी 36.00 कोटी, पुरातन मंदिर व मठांचे जतन व संवर्धन 254.51 कोटी, मंदिर परिसर कॉरिडॉर 510.27 कोटी व एकूण पंढरपूर कॉरिडॉर 1,089.44 कोटी, नगर प्रदक्षिणा मार्ग विकास 162.84 कोटी, नदी घाटांचा विकास व सुशोभीकरण ₹888.38 कोटी, वाहतूक व व्यापारी संकुल 460.40 कोटी, शहर सुशोभीकरण 121.60 कोटी, शहरास जोडणारे पूल व हेलिपॅड 900.00 कोटी, पालखी तळांचा विकास ₹135.11 कोटी, पुनर्वसन खर्च 1,092.12 कोटी, भूमिसंपादन व बाह्य इमारत मोबदला 234.40 कोटी, ज्यामुळे एकूण पुनर्वसन व मोबदला 2,026.52 कोटी इतका आहे. श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी 99 कोटीचा निधी मंजूर –

पंढरपूर येथे 65 एकर जवळील रेल्वेच्या जागेवर श्री संत नामदेव महाराज स्मारक निर्माण करण्यासाठी 99.99 कोटीचा निधी मंजूर असून या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
यावेळी या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले वास्तूविशारद योगेश राठी यांनी श्री संत नामदेव महाराज समारक अंतर्गत अंतर्भूत केलेल्या कामांची माहिती पीपीटी द्वारा बैठकीत सांगितली.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री

कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134275

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697