Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 28, 2026
in सोलापूर
0
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना एक कोटीचे विमा सुरक्षा कवच

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने दहा हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना विमा सुरक्षा कवच प्रदान करून राज्यात विशेष उपक्रम राबविला आहे. राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी १ कोटी रूपये सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या केंद्रप्रमुख पदस्थापनेचे आदेशाचे वितरण व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सॅलरी सुरक्षा कवच करार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांना नवीन वाहनाचे चावी प्रदान आज ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समिती सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,स्टेट बॅंक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आनंदकुमार काटकर, मुख्य व्यवस्थापक अनिकेत शिवडेकर, ट्रेझरी शाखेचे व्यवस्थापक अतुल मगदुम, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे , लेखाधिकारी मिरगळे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचारी सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच करार व केंद्र प्रमुख पदस्थापना आदेशाचे वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांना सेवा देत असताना अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षा कवच देऊन राज्यात आदर्श निर्माण केला आहे. सिईओ कुशल जैन व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांचे अभिनंदन करून हा उपक्रम राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे कर्मचारी यांच्या साठी राबविण्यात येणार आहे. अपघातात अपंगत्व आल्यास अंपगत्वाच्या टक्केवारीनुसार जास्तीत जास्त ८० लक्ष रूपये, अपत्यांचे विवाहसाठी आर्थिक मदत, एका अपत्याचे उच्च शिक्षणासाठी १० लक्ष मदत असे विविध सुरक्षा कवच देणारा हा नाविन्य उपक्रम राज्यात राबविणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा - पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135066

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697