Monday, June 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 28, 2026
in सोलापूर
0
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सामुदायिक नमाज पठण करीत वरूणराजाला साकडे

सोलापूर,: जून महिना संपत आला तरी सोलापूरसह राज्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या साठ्यात झपाट्याने घट होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना करत ‘सलातुल इस्तिस्का’ ही पावसासाठीची विशेष नमाज अदा केली.

सोलापूरात रंगभवन येथील अहले हदिस ईदगाह येथे मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर उपस्थित सर्वांनी मनोभावे अल्लाहकडे पावसासाठी दुवा केली. हात वर करून, भरून आलेल्या डोळ्यांनी आणि कंठ दाटून आलेल्या आवाजात अल्लाहकडे रहमत स्वरूपात पाऊस बरसविण्याची याचना करण्यात आली. ईदगाह परिसरातील हे भावनिक वातावरण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.
यावेळी मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी खुतबा सादर करत, देशात कुठेही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पाऊस पडावा, जनावरांना चारा व पाणी मिळावे, तलाव, विहिरी आणि धरणे भरून निघावीत तसेच संपूर्ण सृष्टीवर अल्लाहची कृपा व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी सोलापूर शहरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260628-WA0046.mp4

इस्लामच्या शिकवणीनुसार जेव्हा समाजात पापांचे प्रमाण वाढते, तेव्हा त्याचा परिणाम अल्लाहच्या रहमतीवरही होतो, असे मानले जाते. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या पापांची मनापासून तौबा (पश्चात्ताप) करून अल्लाहकडे क्षमा मागावी आणि त्याच्याकडे रहमत म्हणून पावसाची याचना करावी, अशी पैगंबर मुहम्मद  यांची शिकवण आहे. त्यानुसार ‘सलातुल इस्तिस्का’ ही विशेष नमाज अदा केली जाते. या नमाजनंतर संपूर्ण देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतशिवार हिरवेगार व्हावेत, जलस्रोत तुडुंब भरावेत आणि अल्लाहने संपूर्ण सृष्टीवर आपली कृपा करावी, अशी सामूहिक दुवा करण्यात आल्याची माहिती जमियत अहले हदिसचे सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी दिली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

Next Post

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या 'खांदेमळणी'साठी वरूणराजाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक