Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 27, 2026
in सोलापूर
0
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एक जुलै कृषी दिनी पुरस्कारांचे वितरण

पुणे: पुणे विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले असून १ जुलै रोजी कृषी दिनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
विविध कृषी पुरस्कार सन २०२३ व सन २०२४ साठी महाराष्ट्र राज्यातून अनुक्रमे ९१ व ९८ शेतकरी, कर्मचारी यांना शेतकरी व कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार जाहीर झाले. एकूण पुरस्कारप्राप्त शेतक-यांपैकी पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे व सोलापूर येथील २२ शेतकरी, कर्मचारी यांची निवड झाली आहे. अहिल्यानगर ५, पुणे ८ व सोलापूर जिल्ह्यातील ९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे आयोजीत करण्यात आला आहे.
सन २०२३ मधील पुरस्कार विजेते 
शिवानंद मल्लेशी शिंगडगाव ( मंद्रूप, सोलापूर) श्रद्धा सत्यवान ढवन (मोरवाडी, अहिल्यानगर) कांतीलाल किसन नलगे (नागरगाव, पुणे) प्रवीण दिलीप माने (बैरागवाडी, सोलापूर) राहूल भारत बनकर (करकंब, सोलापूर) सदाशिव मनोहर चौघुले (जुजारपूर, सोलापूर) गणपतराव बाळासाहेब शिंदे (रहिमतपूर ,अहिल्यानगर) यतीन बापूराव घुले (काटेवाडी, पुणे) प्रणव राजकुमार बिराजदार ( निंबर्गी, सोलापूर) आदिवासी एकता शेतकरी गट (गुंजाळवाडी अहिल्यानगर) नविनचंद्र हरिश्चंद्र बोराडे,उप कृषी अधिकारी (मावळ, पुणे)
सन २०२४ मधील पुरस्कार विजेते
समीर मोहनराव डोंबे (खोर, पुणे) छाया तानाजी पवार (कुरणेवाडी, पुणे) खुशालचंद्र बाबासाहेब मोरे (बारलोणी, सोलापूर) योगेश नामदेव धनगर (तांदुळवाडी , पुणे) सुरज सुखदेव अवताडे ( एखतपूर ,सोलापूर ) अमर अशोकराव भोसले (सराटी , पुणे) गोवर्धन प्रल्हाद खेडकर (भालगाव, अहिल्यानगर) संतोष भिकाजी धुमाळ (पेठ, पुणे ) गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार (निंबर्गी, सोलापूर) शंकर जगन्नाथ केंगले (डोण, पुणे) सुखदेव ज्ञानदेव जमधडे (शेवगाव, अहिल्यानगर)
आदिंचा समावेश आहे.

Previous Post

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

Next Post

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे 'सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134275

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697