Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 26, 2026
in सोलापूर
0
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 29;

0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अवैद्य मुरूम उपसा कारवाईवेळी ‘चोर सोडून संन्याशाला फाशी‘

ठेकेदार व वाहनचालकांना सोडून शेतकर्‍यांवर कारवाई

मंद्रूपचे तहसीलदार अॅक्शन मोडवर 

दक्षिण सोलापूर..
राजूर व बंकलगी शिवारात अवैद्य मुरूम उपसा होत असल्याबद्दल शेतकर्‍यांनी तक्रार केली. त्यामुळे मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी औराद मंडल अधिकारी सरकाझी व तलाठी यांना “कारणे दाखवा” नोटीस दिली. त्यामुळे त्यांनी पंचनामा सादर केला. मात्र पंचनाम्यात उल्लेख मुरूमाचे अवैद्य उपसा होत असताना औराद मंडल अधिकार्‍यांनी “अर्थ”पूर्ण भूमिका घेतली. त्यामुळे तहसीलदारांच्या कारवाईमुळे त्यांच्यावर पंचनामा करण्याची वेळ आली. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैद्य मुरूम उपसा होत असताना औराद मंडल अधिकारी दुर्लक्ष केल्याने उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
औराद मंडल परीसरात अवैद्य मुरूम उपसासंदर्भात तक्रार केल्यानंतर मंडल अधिकारी यांनी कारवाई सुरू केली. मात्र ठेकेदार व वाहनचालकांशी हितसंबंध ठेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात आल्याने कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा सुरू आहे. या कारवाईत शेतीसाठी व पडीक जमीन उपयोगात आणण्यासाठी मुरूम उपसा करताना मंडल अधिकार्‍यांनी जाणिवपूर्वक कारवाई केल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी फेरचौकशी करून कारवाईचा निर्णय घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
औराद मंडलमधील राजूर व बंकलगी शिवारात अवैद्य मुरूम उपसा सुरू असताना मंडल अधिकार्‍यांनी “आर्थिक हितसंबंध” ठेऊन कारवाई टाळल्याचे सांगण्यात येते. मुरूम उपसामुळे रस्ता खराब होत असल्याने मुरूम उपसा बंद करण्याबाबत शेतकर्‍यांनी तक्रार केली. यापूर्वी अनेक शेतामधून ठेकेदार व निवृत्त तलाठ्यांच्या वाहनामधून मुरूम उपसा होत असताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे.
राजूर व बंकलगी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात मुरूम उपसाचे खड्डे असल्याने व राॅयल्टी भरण्यात न आल्याने मुरूम उपसा करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन उपविभागीय अधिकार्‍यांनी मंद्रूप तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे तहसीलदारांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना “कारणे दाखवा” नोटीस देताच हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
औराद मंडल अधिकारी यांनी कारवाई करताना मुरूम उपसा करणार्‍यांना पूर्वसूचना दिल्याने दररोज मुरूम उपसा वाहने कारवाईत दिसत नाहीत. निवृत्त तलाठी टिपर गायब झाले. शिवाय ठेकेदारही पसार झाले. त्यामुळे कारवाई दाखविण्यासाठी शेती विकासाची कामे करणार्‍या जेसीबी व ट्रॅक्टरवर कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. औराद मंडल अधिकारी यांनी मुरूम उपसा कारवाई करताना “चोर सोडून संन्याशाला फाशी” दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे औराद मंडल अधिकारी यांच्या कारवाईची पुर्नचौकशी करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

Next Post

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134280

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697