Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 26, 2026
in सोलापूर
0
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर, :- राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ व महापुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळावे व कृषी क्षेत्र सक्षम व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. याआधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (2017), महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (2019) व प्रोत्साहनपर लाभ योजना (2022) राबविण्यात आले होते .

कर्जमुक्ती मर्यादा : प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती.

अल्पमुदत पीक कर्ज : 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले कर्ज पात्र.

जमीन धारणेची अट नाही :

सर्व शेतकऱ्यांना लाभ.

एकवेळ समझोता योजना :

2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर शासनाचा लाभ.

प्रोत्साहनपर लाभ : नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन.

अपात्र गट– मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे व निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक अपवाद) यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभार्थी व निधी- या योजनेत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून 36,500 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक असेल.

ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

Next Post

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई "संशयास्पद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135066

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697